मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. गुडीपाडवा मेळाव्यातील भूमिकेवर राज ठाकरे ठाम असून ‘तुमचे भोंगे काढा अन्यथा हनुमान चालिसा लावू’, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
राज ठाकरेंनी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलतानाही मशिदींवरील भोंग्यांवरून अल्टिमेटम दिला. राज ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्यातील वातावरण तापलं असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriye Sule) यांनी राज ठाकरेंना थेट इशारा दिला आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि मराठीवर खरंच प्रेम असेल तर खाल्लेल्या मिठाला जागा. महाराष्ट्राची बदनामी करू नका. तुम्हाला जे भाषण करायचे ते करा पण आम्हाला काम करू द्या. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आणि जर कोणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही, असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला आहे.
दरम्यान, भाषण करून दोघांच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राची बदनामी करणं तुम्हाला शोभत नाही, असा अप्रत्यक्ष टोला सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्रासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात पाऊस कोसळणार
मोठी बातमी! SBIच्या ग्राहकांना मोठा झटका
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचं मोदींना पत्र, केली ‘ही’ मागणी
धक्कादायक! शिवसेना आमदाराच्या पत्नीने राहत्या घरी घेतला गळफास
Comments are closed.