बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मालिका सुरु होण्याआधीच भारताला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू खेळणार नाही!

कानपूर | न्यूझीलंड विरूद्धची कसोटी (IndVSNz Test) सामना सुरू होण्याअगोदर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज लोकेश राहुल (K L Rahul) दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. त्यामुळे लोकेश राहुलच्या जागी आता सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संघात खेळताना दिसणार आहे.

सुर्यकुमार यादल इंग्लंड दौऱ्यावेळी भारतीय टीमचा भाग होता. मात्र, सुर्यकुमार यादवला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत सुर्यकुमारला बदली खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच बीसीसीआयच्या संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकेश राहुल पहिला कसोटी सामना खेळणार नसल्याची देखील माहिती आहे.

दरम्यान, लोकेश राहुलला किती दुखापत झाली आहे याबाबत माहिती समोर आली नाही. मंगळवारी कानपुरच्या ग्रीनपार्क स्टेडीयमवर भारतीय संघाने नेट प्रॅक्टिस केली. परंतु, यावेळी राहुल सहभागी होताना दिसला नाही. दुखापतीमुळे राहुलला सरावतही सामील होता आलं नाही.

प्रॅक्टिस करताना शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल सोबत सराव करताना दिसून आले. पहिल्या कसोटी सामन्यातही शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल सलामीवीर असण्याची शक्यता आहे. आता न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सुर्यकुमार यादवला कसोटी सामन्यात करिअर करण्याची संधी मिळणार आहे.

थोडक्यात बातम्या-

सावधान, नव्या फंगसमुळे 2 डॉक्टरांचा मृत्यू, आधीच्या तुलनेत मृत्यूचा धोका जास्त

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी मिळणार पैसे

तिकडं राष्ट्रवादीचं कार्यालय फुटलं, इकडं ‘ओ शेठ’ गाण्यावर तुफान डान्स

“लग्न झालं, अजित पवार 48 तासांसाठी नवरदेव झाले अन् नवरी…”

लहान मुलांसोबतचा ओरल सेक्स गंभीर गुन्हा नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More