बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ललित मोदींच्या प्रेमात पडण्यापूर्वी सुष्मिताच्या ‘या’ 10 अफेअर्सचीही रंगली होती खूप चर्चा

मुंबई | बॉलिवूड सिनेतारका सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि देशाबाहेर पळून गेलेले उद्योगपती आणि आयपीएलचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांच्या प्रेमप्रकरणाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. ललित मोदी यांनी नुकतेच त्यांचे खाजगी फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपचा खुलासा केला. तर ललित मोदी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी सुष्मिताच्या पहिल्या 10 अफेअर्सची देखील चर्चा रंगली होती.

सुष्मिता सेनच्या प्रेमप्रकरणातील पहिले नाव आहे दिग्दर्शक विक्रम भट (Vikram Bhat). त्यानंतर प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक संजय नारंगबरोबर (Sanjay Narang) देखील सुष्मिताचे प्रेमप्रकरण सुरु होते. बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी मॅनेजर बंटी सतदेव (Bunty Satdev) आणि सुष्मितालादेखील अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं होतं. मात्र, या सर्व अफवा असल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला होता. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hodda), प्रसिद्ध व्यावसायिक इम्तियाज खत्री (Imtiyaz Khatri) आणि दिग्दर्शक मुदस्सर अजीज (Mudassar Aziz)यांच्यासोबत देखील सुष्मिताचं नाव चर्चेत होतं.

सुष्मिता सेन हीचे नाव पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरम (Wasim Akram) यांच्याशी देखील जोडले जात होते. ते तिचे सातवे प्रेमप्रकरण होते. सर्वात मोठे आणि श्रीमंत व्यावसायिक अनिल अंबानीसोबत (Anil Ambani) देखील तिचे नाव जोडले जायचे. व्यावसायिक रितीक भसीनला (Ritik Bhasinala) याच्यासोबत ती चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. आणि वयाने 15 वर्षे लहान रोहमन शॉल (Rohaman Shol) बरोबर देखील सुष्मिता चर्चेत होती.

दरम्यान, रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपनंतर ललित मोदीसोबतच्या रिलेशनशिपमुळे सुष्मिता पुन्हा एकदा चर्चेत आली. 46 वर्षीय सुष्मिता सेन ही आपल्या हटके जीवनशैलीमुळे प्रसिद्ध आहे. सुष्मिता अद्याप अविवाहित आहे असून तिने वयाच्या 25 व्या वर्षी दोन मुलांना दत्तक घेतले आहे.

थोडक्यात बातम्या –

‘सुरूवातीलाच अशी ओढाओढ चिठ्ठ्या देणं सुरू झालं, पुढे पुढे तर…’; अजित पवारांची बोचरी टीका

‘एकनाथ शिंदेंनी तुम्हाला राजकीय कुबड्या दिल्या’, निलेश राणे दीपक केसरकरांवर बरसले

शिंदे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावरून अजित पवार संतापले, म्हणाले…

मोठी बातमी! नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकारकडून स्थगिती

देवेंद्र फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट, ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर खलबतं होणार?

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More