बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अधिवेशनात गोंधळ घालणार्‍या भाजपच्या 12 आमदारांवर एक वर्षांसाठी झाली ‘ही’ कारवाई

मुंबई | आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी विधिमंडळ अधिवेशन चांगलंच पेटल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, केंद्र सरकारने ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यानंतर एम्पिरिकल डाटा राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा, असा ठराव या अधिवेशनादरम्यान राज्य सरकारतर्फे मांडण्यात आला होता.

हा ठराव मंजूर करण्यावरून विरोधक व सत्ताधारी यांच्यात चांगलाच संघर्ष झाल्याचं या अधिवेशनादरम्यान पाहायला मिळालं. या प्रकरणात विरोध करत असताना विरोधी पक्षाच्या काही आमदारांनी सभागृहात धक्काबुक्की केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला आहे. तसेच विरोध करत असताना काही आमदारांनी अध्यक्षांचा माईकही ओढला.  

या प्रकरणात भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षांसाठी निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या निलंबनावरून सरकारवर जोरदार टीका करत ही फक्त एक कहानी रचून केलेली कारवाई आहे, असं म्हटलं आहे.

यासंबंधी आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर या भाजपच्या 12 आमदारांवर एक वर्षांसाठीची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More