बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिंदुत्वाची तुलना तालिबानशी केल्याने स्वरा भास्कर सोशल मीडियावर ट्रोल!

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर अॅक्टिव असणारी स्वरा मोदी सरकारवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. वेळोवेळी तिने मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांच्यावर टीका केली आहे. त्यातच आता स्वरा पुन्हा चर्चेत आलीये. एका ट्विटमध्ये तिने हिंदुत्वाची तुलना तालिबानशी केली आहे.

आम्ही हिंदुत्व दहशदवादाशी ठिक असू शकत नाही आणि तालिबानी दहशदवादामुळे प्रत्येकजण हैराण आणि उद्ध्वस्त झालाय. आपण तालिबानच्या दहशतीसह शांत बसू शकत नाही. पण हिंदुत्वाच्या दहशतीचा राग येऊ शकतो, असं खोचक ट्विट स्वरा भास्करने केलं आहे. तर, आपली मानवी आणि नैतिक मुल्य दडपलेल्यांच्या ओळखीवर आधारित नसावीत, असंही स्वरा म्हणाली.

तिने या ट्विटद्वारे थेट हिंदुत्वावर हल्लाबोल केलाय. त्यामुळे आता भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळालेत. तिच्या ट्विटनंतर अनेकांनी तिच्या अटकेची मागणी केली आहे. तर काहींनी तिच्या ट्विटचं कौतुकही केलं आहे. तिच्या ट्विटमुळे हिंदुत्व मानणाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

दरम्यान, कट्टर इस्लामिक संघटन असलेल्या तालिबानने अफगाणिस्तावर कब्जा मिळवला आहे. देशावर कब्जा केल्यानंतर तालिबानने शरियाप्रमाणे देश चालणार असल्याचं सांगितलं होतं. तर शरियाचं पालन करूनच महिलांना काम करता येणार असल्याचं तालिबानने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता अफगाणिस्तानात धार्मिक रंग चढू लागल्याचं दिसतंय.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

‘विजय डोक्यात जाऊ देऊ नका’; मोदींचा ऑलिम्पिक विजेत्यांना कानमंत्र

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

“बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या”

शिवसेनेला धक्का! ‘या’ मोठ्या नेत्याची आमदारकी धोक्यात

“भाजपने देशात हत्याकांड घडवलं, नरेंद्र मोदींनी देशाची जाहीर माफी मागावी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More