बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकार ‘त्या’ गोष्टींवर विचार करायला तयार, शेतकऱ्यांनो आंदोलन मागे घ्या”

नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने 27 सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ पुकारलं. केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चा सुरु आहे. या भारत बंदला अनेक राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रण दिलं आहे.

कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन तीव्र करणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन चर्चेसाठी पुढे येण्याचं आमंत्रण नरेंद्र तोमर यांनी दिलं आहे. यावेळी कृषी कायद्यांसंबंधी शेतकऱ्यांनी त्यांचं म्हणणे मांडावे, त्यांचा ज्या गोष्टींवर आक्षेप आहे, त्यावर सरकार विचार करायला तयार आहे, असं नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे.

याआधी अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत, तरी देखील काही गोष्टी सांगायच्या राहिल्या असतील तर सरकार आवश्य चर्चा करेल, असं नरेंद्र तोमर म्हणाले. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. भारत बंदमुळे काही राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारत बंद दरम्यान देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, शैक्षणिक आणि इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील. मात्र रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहील.

थोडक्यात बातम्या-

“भरकटलेली वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना नेमकं कुठं जायचं आहे?”

“भाजपने मनसेशी युती करावी, त्यांना निवडणुकीत फायदा होईल”

पायातून रक्त वाहत असताना देखील CSKचा ‘हा’ खेळाडू खेळतच राहिला, फोटो व्हायरल

ईडीच्या चौकशीवेळी आनंदराव अडसुळांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल केलं

जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है?- गोपीचंद पडळकर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More