बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील”

इस्लामाबाद | तालिबाननं आफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथील नागरिक पलायन करताना दिसत आहे. तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणिस्तानातील काबुलमध्ये सध्या गंभीर वातावरण निर्माण झालं आहे. काबुलवर ताबा मिळवल्यानंतर पाकिस्तानकडून तालिबानचं समर्थन करण्यात आलं. अशातच आता एका महिला नेत्याच्या दाव्यानं खळबळ पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडूनही तालिबान सत्तेत आल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला होता. आता त्यांच्याच पक्षाच्या तहरिकए इंसाफमधील एका महिलेनं खळबळजनक दावा केला आहे. तहरिक ए इंसाफ पक्षाच्या सदस्य नीलम इरशाद शेख यांनी तालिबापान किस्तानसोबत असल्याचं म्हटलंय. आता तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून ते पाकिस्तानला देतील, असा दावा नीलम यांनी केला आहे.

नीलम यांच्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे. नीलम यांनी एका डिबेट शोमध्ये म्हटलं होतं की, तालिबान आमच्यासोबत असून ते आम्हाला काश्मीर जिंकून देतील. भारतानं आमचे तुकडे केले असले तरी आम्ही पुन्हा एकत्र येऊ.

नीलम यांनी म्हटलं की, तालिबान आणि पाकिस्तान एकमेकांना सहकार्य करत आहे. याशिवाय अफगाणिस्तानमधील अमेरिका समर्थित सरकारला उखडून टाकणाऱ्या तालिबानला पाकिस्तानकडून आधीपासूनच मदत होती. सध्या नीलम यांनी केलेल्या या दाव्याच्या अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या –  

नारायण राणेंना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही- भास्कर जाधव

“राणेंच्या घराला सिंहाची गुहा म्हणणं हा सिंहाचा अपमान”

नारायण राणेंच्या घरासमोर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी!

…तर नारायण राणेंना अटक होऊ शकते…- असीम सरोदे

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं?- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More