बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एअर इंडियाच्या बोलीवर टाटा समुहाची मोहर; तब्बल 68 वर्षानंतर पुन्हा मिळवली मालकी

नवी दिल्ली | एकेकाळी भारत सरकारची आर्थिक स्त्रोत असलेली एअर इंडिया ही सरकारी कंपनी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात होती. कंपनीच्या आणि केंद्राच्या आर्थिक संकटाला हातभार लागावा यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियाला विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता या खरेदीसाठी बोली लावण्यात आली आहे.

एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया जानेवारी 2020 मध्येच सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याची विक्रीची प्रक्रिया थांबवण्यात आली. एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समुहाने रूची दाखवली होती. त्यानंतर कंपनीने एक पत्र देखील केंद्र सरकारकडे पाठवलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारने काही पात्र कंपन्यांना बोलीसाठी बोलवलं होतं. त्यावर आता टाटा समुहाने मोहर लावली आहे.

एअर इंडियाच्या खरेदीसाठी केेेंद्र सरकारने राखीव किंमत निश्चित केली होती. त्यापेक्षा 3000 हजार कोटी जास्त बोली लावत एअर इंडियाची मालकी घेतली आहे. टाटाचे प्रतिस्पर्धी स्पाइटजेटने लावलेल्या किंमतीपेक्षा टाटा सन्सने 5000 कोटी अधिक बोली लावली आहे.

दरम्यान, टाटा समूहाने टाटा एअरलाइन्स या नावाने एअर इंडिया सुरूवात केली होती. ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची सुरूवात झाली होती. मात्र, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1953मध्ये एअर इंडिया भारत सरकारच्या ताब्यात गेली होती. त्यानंतर आता तब्बल 68 वर्षानंतर एअर इंडियाने पुन्हा मालकी मिळवली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आईस्क्रीम की इडली ?’, शशी थरूर यांचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

स्पर्धा परीक्षेचा आणखी एक बळी! अपयशानं विद्यार्थ्यानं उचललं धक्कादायक पाऊल

स्मृती मंधानाचं ऐतिहासिक शतक! अशी कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटर

“कार्यकर्त्याचा अपमान मला मान्य नाही, काहीही अडचण आली तर फोन करा”

लहान मुलांसाठी महत्त्वाची बातमी ! पुण्यात ‘या’ लसीची ट्रायल सुरू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More