बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चहा महागला! आता ‘इतक्या’ रुपयांना मिळणार चहा, वाचा नवे दर

मुंबई | देशात आणि जगभरात चहाचे अनेक चाहते आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात चहा हे पेय घेतात. अनेक लोकांच्या दैनंदिन जीवनातील चहा अविभाज्य भाग आहे. तुम्ही जर चहा पित असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. चहा आणि कॉफीचे दर आता महागणार आहेत. टी अॅण्ड कॉफी असोशियशनने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य दरांचा चहाच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. साखर, गॅस, दुधाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे नाइलाजास्तव चहाच्या किंमतीमध्ये वाढ करावी लागत आहे, असं टी अॅण्ड कॉफी असोशियशयने म्हटलं आहे. त्यामुळे ज्याठिकाणी चहाच्या एका कपाची किंमत 10 रूपये होती तिथे 12 रूपये मोजावे लागणार आहेत. चहासाठी लागणाऱ्या दूध दरातही 2 रूपयांची वाढ झाली आहे.

चहासोबतच कॉफीच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. ब्रु कॉफीच्या किंमतीमध्ये तीन ते सात टक्यांनी वाढ करण्यात आली आहे. चहा पिण्याचे अनेक दुष्परिणाम असले तरी देखील अनेक लोक चहा पितात. कष्टकरी वर्ग ते मालकांपर्यंत अनेकांचं चहा आवडत पेय आहे. चहाचे दर वाढविण्यात आल्यामुळे चहाप्रेमींच्या खिश्याला आता झळ बसणार आहे.

दरम्यान, चहासाठी लागणाऱ्या दूध दरातही 2 रूपयांची वाढ झाली आहे. वीज ,पॅकेजिंग, लॉजेस्टीक आणि चारा यांच्या वाढत्या किंमतीमुळे दूध उत्पादक महासंघ आणि कंपन्यांनी दूधाच्या दरात वाढ केली आहे. चहासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याचे दर वाढल्याने व्यावसायिकांना आर्थिक गणित जुळवणे कठीण झाले होते. त्यामुळे चहा संघटनांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात बातम्या- 

कधीही लाॅकडाऊन न लागलेल्या देशात कोरोनाचा उद्रेक, समोर आली धक्कादायक आकडेवारी

सर्वात मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून होळीचे सगळे निर्बंध मागे

“मुलीवर लैंगिक अत्याचार करताना तीनं अंतर्वस्त्र घातली असली तरी…”; न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी! शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

…तर कुणीही सहजपणे तुमच्या प्रेेमात पडेल, तज्ज्ञांनी सांगितली ट्रीक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More