बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

मुंबई |  ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता दुसऱ्या एका नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे.

त्यांना कोरोनाची लागण कुठे आणि कशी झाली किंवा ते कुणाच्या संपर्कात आले हे अद्याप कळू शकलेले नाहीये मात्र त्यांना त्यांच्या गावावकडून मुंबईला आणण्यात आलं आहे. त्यांना मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे.

त्यांच्यावर मुंबईतल्या एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वत: मुख्यमंत्री तसंच मंत्रिमंडळातले काही ज्येष्ठ नेते त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात आहेत.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळातील दुसऱ्या मंत्र्याला आता कोरोनाची लागण झाल्याने चिंता अधिक वाढली आहे. आता इथून पुढच्या कॅबीनेट बैठका किंवा थेट लोकांमध्ये जाऊन किंवा थेट लोकांच्या संपर्कात येणं लोकप्रतिनिधी टाळू शकतात.

ट्रेंडिंग बातम्या-

‘सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर’; गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने सुनावलं

31 मेनंतर लॉकडाऊन संपणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

आज राज्यात 1196 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा तुमच्या भागात किती नवे रूग्ण मिळाले…

…म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार का?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

कोरोनामुळे जग बुडालं पण ‘हा’ व्यक्ती झाला मालामाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More