बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त आहेत”

मुंबई | जेव्हापासून ओबीसी आरक्षण रद्द केलं आहे तेव्हापासून महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण खूप गढूळ झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. वारंवार याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगत असते. अशातच पुन्हा एकदा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यातील सरकारच्या वेळकाढूपणामुळे ओबीसी आरक्षण हातातून गेलं असून, ओबीसीचं संपूर्ण आरक्षण संपवण्याचं काम या सरकारने केलं असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.  आज भाजप पक्षाकडून ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेत्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते.

तसेच महाविकास आघाडीमधील नेते कमी आणि त्यांचे पोपटंच जास्त बोलत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. रोज खोटं बोल पण रेटून बोल, असं महाविकास आघाडीतील नेत्यांना सांगितलं जात आहे. त्याचप्रमाणे आघाडीमधील नेत्यांना माहित आहे की, आपल्याच चुकीमुळे राज्यातील ओबीसी आरक्षण गेलं आहे. त्यामुळे मालक जसं सांगतात, तसंच महाविकास आघाडीतील पोपट बोलत असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बहुजनांचं राज्य आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वात जास्त मंत्री हे ओबीसीचे आहेत. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर ओबीसीचा खरा पक्ष भारतीय जनाता पार्टी असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. ओबीसींना संविधानात स्थान देण्याचं कामही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालं असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सकारात्मक बातमी! देशातील कोरोना आला आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

आयुषमानच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल, पाहा फोटो!

मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचला आजोबांचा जीव; थरारक व्हिडीओ व्हायरल

‘लस घ्या आणि बाहुबली व्हा’; नरेंद्र मोदींचं जनतेला आवाहन

“तुम्ही आमच्या फोनमध्ये काय वाचता हे आम्हाला माहितीये”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More