मुंबई | बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने साकारलेल्या ‘तान्हाजी’ या सिनेमातून नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचण्यास मदत झाली. कोंढाणा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली. याच पार्श्वभूमीवर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्मभूमी स्थळाच्या विकासासाठी पाच कोटींची तरतूद करण्याची घोषणा अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत केली.
शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून महाविकास आघाडीने अर्थसंकल्प सादर केल्याचं सांगितलं. आर्थिक अडचणी असल्या तरी उत्पन्नाचे स्रोत वाढवू, अतिरिक्त खर्चाला कात्री लावत विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचंही देसाई यांनी सांगितलं.
स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमरठच्या विकासासाठी मागाल ते सर्व देण्याचं आश्वासन स्थानिकांना दिलं होतं. प्रत्यक्षात त्यासाठी कोणतीच घोषणा केली नाही. किमान मुख्यमंत्री जी आश्वासनं देतात त्याची तरी नोंद ठेवा, असा टोला विधान परिषदेचे प्रवीण दरेकर यांनी लगावला.
दरम्यान, औरंगाबाद येथील क्रिडा संकुलाचा प्रस्ताव का आला नाही?, याबाबत अधिवेशनानंतर क्रिडा विभागाशी चर्चा करून कार्यवाही करण्याचं आश्वासनही देसाई यांनी यावेळी दिलं.
ट्रेंडींग बातम्या-
रोहित तू काहीही काळजी करु नको आणि… ;मुख्यमंत्र्यांनी नोकर भरतीबाबत पवारांना दिलं आश्वासन
मुंबई सेंट्रल स्थानकाच्या नामांतराला ठाकरे सरकारची मंजुरी
महत्वाच्या बातम्या-
सोन्याची लंका जाळायला भिभीषण आता आमच्याकडे आलाय- शिवराजसिंह चौहान
“कोरोनामुळे शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करावी”
मुनगंटीवारांची पलटी; आता म्हणतात ‘मी तसं म्हणालोच नाही’
Comments are closed.