बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! कोरोना निर्बंधांबाबत ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Corona) व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात कोरोना आटोक्यात आल्याने दोन वर्षांपासून लादलेले अनेक कोरोना निर्बंध (Restrictions) शिथील करण्यात आले. त्यानंतर आता ठाकरे सरकार कोरोना निर्बंधांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

गुडीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रातील जनतेची कोरोना निर्बंधांमधून सूटका होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ठाकरे सरकार (Thackeray Goverment) राज्यात 1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध हटवणार असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यातील कोरोना निर्बंध 1 एप्रिलपासून शिथील करण्यात येणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा सरकार मागे घेणार आहे. त्यामुळे जनतेवर लादण्यात आलेले निर्बंध देखील संपणार आहेत. तर नागरिकांची मास्कपासून देखील सुटका होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असला तरी चीनसह अनेक युरोपीयन देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने थैमान घालायला सुरूवात केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेही कोरोना निर्बंध शिथील केल्यानंतर देखील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या होत्या.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! युक्रेनवरील आण्विक हल्ल्याबद्दल रशियाचं मोठं वक्तव्य

राजकीय वर्तुळात खळबळ! संजय राऊत आणि ‘या’ भाजप खासदारामध्ये 3 तास बैठक

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू

“… पण मला वाटतंय आशिष शेलारांच्याच मेंदूला लकवा आलाय”

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, मुंबईत डिझेलचीही शंभरी पार; वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More