बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारचा दणका; विनाकारण भीती दाखवून अ‌ॅडमिट करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई

मुंबई | रुग्णांना विनाकारण भीती दाखवून हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करुन घेतल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. तसेच अव्वाच्या सव्वा बील आकारलं म्हणून ठाणे महानगर पालिकेने ठाण्यातील दोन खासगी हॉस्पिटलला मोठा दणका दिला आहे.

कोणताही आजार नसताना ठाण्यातील दोन हॉस्पिटल्सनी 13 ठाणेकरांना दाखल करुन घेतलं होतं आणि त्यांच्यावर 7 दिवस उपचार करुन त्यांच्याकडून लाखोंची बीलं आकारल्याची माहिती आहे.

ठाणे महानगर पालिकेकडे याबाबत तक्रार आल्यावर ठाणे महानगर पालिकेने चौकशी करुन या दोन हाॉस्पिटलवर कारवाई केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांककडून हॉस्पिटल विरोधात तक्रारी येत होत्या. त्याची शाहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे.

नागरिकांची पिळवणूक झाल्यानंतर त्या हॉस्पिटलवर कारवाई होणं ही राज्यातील पहिलीच वेळ असून यामुळे आता विनाकारण उपचार करणाऱ्यांना चपराक बसण्यास मदत होणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

अर्थव्यवस्थेवरुन टीका करणाऱ्या राजीव बजाज यांना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, म्हणाले…

“कोरोना संकटाच्या काळात भारताला मोदींसारखं नेतृत्व लाभलं हे देशाचं नशीबच”

महत्वाच्या बातम्या-

“मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आमदारांना जनतेने चपलीने मारायला हवं”

राज्यसभा निवडणुकीअगोदर गुजरातमध्ये राजकीय स्फोट होण्याची शक्यता; काँग्रेसमध्ये खळबळ

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील धारावीसाठी गुडन्यूज!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More