ठाणे पोलिसांची माघार, मनसे कार्यकर्त्यांच्या जामिनाची रक्कम 1लाखावर!

ठाणे | ठाणे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांच्या जामिनाची रक्कम 1 कोटीवरून थेट 1 लाख केलीय. तत्पूर्वी तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ द्या मग आम्हीही औकातीप्रमाणे 200 कोटींचे दावे ठोकू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिला होता.

फेरीवाला आंदोलना दरम्यान ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी जामिनासाठी नोटीस बजावण्यात आली होती. जाधव यांना 1 कोटी आणि इतरांना 25 लाखांसाठी नोटीस बजावली होती.

सर्व गुन्हे राजकीय स्वरूपाचे असल्यानं एवढी मोठी रक्कम जामिनासाठी देण्यास मनसेचा विरोध होता. त्याविरोधात राज यांनी आवाज उठवताच ठाणे पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतलीय.