Top News देश

अमेरिका ही मदत कधीच विसरणार नाही; ट्रम्प यांनी मानले मोदींचे आभार

Loading...

नवी दिल्ली |  भारताने माणुसकी दाखवत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधावरची निर्यातबंदी हटवली आहे. अमेरिकेला या औषधाची सध्या सर्वाधिक गरज आहे. भारताने निर्यातबंदी उठवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाधान व्यक्त केले आहेत. तसंच भारतीयांचं आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद देत आभार मानले आहेत.

भारताने केलेली मदत अमेरिका कधीच विसरणार नाही, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. अडचणीच्या काळात मित्राचं सहकार्य महत्त्वाचं असतं. सध्या अमेरिकेला भारताची गरज होती आणि एक मित्र म्हणून भारताने अमेरिकेला मदत केली आहे. हे आम्ही कधीच विसरणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

याआधी ट्रम्प यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाच्या पुरवठयावरुन भारताला धमकी दिली होती. त्यानंतर भारताने 24 औषधांवरची निर्यातबंदी उठवली. अमेरिकेच्या दबावानंतर ही निर्यातबंदी उठवल्याची चर्चा देखील सुरू आहे.

भारताच्या क्षमतांवर अवलंबून असणार्‍या सर्व शेजारी देशांना योग्य प्रमाणात पॅरासिटामॉल आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विनचा परवाना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेल्या काही राष्ट्रांना आम्ही ही आवश्यक औषधे पुरवत आहोत, असं भारत सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

‘बाहेरचा आला नी धमकावून गेला’; ट्रम्प यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिनेत्री संतापली

पुण्यात आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू; दिवसभरात आठ जणांचे बळी

महत्वाच्या बातम्या-

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट; आला हा रिपोर्ट

कोरोना चाचणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय

मला माफ करा, पण त्याशिवाय पर्याय नव्हता- उद्धव ठाकरे

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या