बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“म्हणून मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते, प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसतं”

मुंबई | सोमवारी रात्री राज कुंद्राला अटक केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. त्याच्या अटकेनंतर आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अश्लील चित्रपट बनवणे आणि अपलोड करण्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला असून राज कुंद्राच्या अटकेनंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. अशातच आता बाॅलिवूडची पंगा क्विन कंगना रणौतनंही यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कंगनानं आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. कंगनाच्या या पोस्टनं सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. कंगना पोस्ट शेअर करत म्हणाली की, याच कारणामुळे मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते. प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसतं. मी माझा आगामी प्रोजेक्ट टीकू वेड्स शेरुच्या माध्यमातून बॉलिवूडचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे, आपल्याला मनोरंजन विश्वात एक मजबूत मूल्य प्रणालीची गरज आहे.

मंगळवारी राज कुंद्राला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी राज कुंद्रा आणि त्याच्या आणखी एका साथीदाराला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं या प्रकरणाचा साडेपाच महिने कसून तपास केला, अनेकांची चौकशी केली, त्यानंतर एकेक गोष्टींचा तपास केला. त्यातून या सगळ्याचा मास्टर माईंड हा राज कुंद्रा असल्याचं समोर आलं.

दरम्यान, गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

 

थोडक्यात बातम्या –  

मास्क घालणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी पुण्यात मास्क लावलाच!

“पतीच्या अटकेनंतर शिल्पा कोणत्या परिस्थितीतून जात असेल, याची कल्पनाही करु शकत नाही”

लाईव्ह मॅचदरम्यान या व्यक्तीने महिलेसोबत केलं वाईट कृत्य; व्हिडीओ व्हायरल

5 वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आजची रुग्णसंख्या आली 400च्या खाली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More