पुणे | छत्रपती संभाजी महाराजांचा काल 342 वा राज्यभिषेक सोहळा पार पडला. किल्ले पुरंदर याठिकाणी 342 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करुन 50 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट या संस्थेच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शहीद जवान निवृत्ती जाधव यांच्या वीरपत्नी सुरेखा जाधव यांच्या हस्ते हा राज्याभिषेक करण्यात आला.
या सोहळ्यात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सागर ताकवले यांना उद्योजक, डॉ. रणजित गायकवाड यांना सामाजिक, हरिश्चंद्र देसाई यांना कृषी आणि जितेंद्र गवारे यांना क्रीडा क्षेत्रातील शंभुगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. राज तपसे यांचा विशेष सन्मान करण्यात आला . तसेच ओंकार जाधव व अथर्व कळंत्रे या खेळाडूंना प्रोत्साहनपर व प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली .
दरम्यान, यावेळी गडावर छत्रपती संभाजी महाराजांचा पालखी सोहळा काढण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल काटे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रदिप कणसे यांनी केले व आभार वैभव शिंदे यांनी मानले .
थोडक्यात बातम्या –
“महिलांचा विनयभंग आणि पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालतायेत”
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर
मोठी बातमी! नितेश राणेंना पुन्हा न्यायालयाचा दणका
जेष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं दुःखद निधन
सोनं-चांदीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा आजचे ताजे दर
Comments are closed.