अहमदनगर महाराष्ट्र

खळबळजनक! बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने आरोपीने पीडितेच्या मुलीला पेटवलं

अहमदनगर | अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने अहमदनगरमध्ये एका आरोपीने थेट पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवल्याची घटना घडलीये.

या घटनेत मुलगी गंभीर जखमी आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजाराम तरटे आणि अमोल तरटे अशी या दोन आरोपींची नावं आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पारनेरमधील आदिवासी समाजातील 26 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, आरोपींनी पीडितेला हा गुन्हा मागे घेण्यास सांगितलं. पीडितेने त्यांची मागणी मान्य न केल्याने आरोपींनी थेट अत्याचारित पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेट्रोल टाकून पेटवल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘भारत आणि चीन हे दोन महान देश….’; चीननं भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही- देवेंद्र फडणवीस

‘ही’ भारतीय कंपनी खरेदी करू शकते टिकटॉक

पवार कुटुंबातील प्रश्न एका मिनिटात सुटेल- राजेश टोपे

कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या जीवनावर येणार वेबसिरीज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या