Top News महाराष्ट्र मुंबई

“धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप राजकीय नसून ते वैयक्तिक”

मुंबई |  राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप राजकीय नसून ते वैयक्तिक आहेत. त्यातून ते नक्कीच मार्ग काढतील. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

तसंच मुंडे यांच्या प्रकरणात पोलीसांनी तक्रार का दाखल केली नाही. यावर राऊतांना विचारलं असता, मला काहीही सांगता येणार नाही. मात्र या विषयाचं भांडवल केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत येईल. असं कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम असल्याचंही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर, भाजप राज्यभर आंदोलन करेल असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

बलात्काराच्या आरोपनंतर धनंजय मुंडेंचं ट्विट; कटुतेवर मात करत….

व्हाॅट्सअपला धक्के सुरुच; ‘या’ बड्या कंपन्यांचा बायबाय; सिग्नलला दिली पसंती!

राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो, संजय राऊतांचा भाजपला तिळगूळ!

“धनंजय मुंडे यांनी जनाची नाहीतर मनाची लाज ठेवून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”

क्रिकेटची हत्या केली म्हणणाऱ्या भाजप खासदाराला हनुमा विहारीचा रिप्लाय, सेहवागला हसू आवरेना 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या