बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; जाणून घ्या नेमकं काय आहे ‘TRUTH SOCIAL’

नवी दिल्ली | अमेरिकेच्या संसद परिसरात दंगल भडकावण्याच्या आरोपाखाली फेसबुकने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई करत फेसबुकने ट्रम्प यांचं अकाऊंट 2 वर्षांसाठी म्हणजेच 2023 पर्यंत निलंबित केलं आहे. त्यानंतर आता ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत स्वतःचं सोशल नेटवर्क लाँच करणार असल्याचं सांगितलं आहे.

लाँच करण्यात येणाऱ्या सोशल नेटर्वकचं नाव ‘truth social’ असं आहे. हे काहीसं ट्विटर सारखंच असेल, असं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये युझर्सना फोटो शेअर करत आपले विचार मांडता येती. याबाबत सांगताना ट्रम्प यांनी ट्विटरवर निशाणा साधला आहे.

ट्रम्प मीडिया आणि टेक्नाॅलाॅजी ग्रूपचा truth social अॅप लाँच करण्याचं उद्दीष्ट हे मोठ्या टेक कंपन्यांसाठी प्रतिस्पर्धी निर्माण करायचं आहे, असं डोनाल्ड ट्रम्पने म्हटलं आहे. तसेच आपण अशा जगात राहतो जिथं तालिबानची ट्विटरवर मोठी उपस्थिती आहे आणि तुमच्या आवडत्या अध्यक्षाला बॅन केलं जातं, अशा शब्दात ट्रम्प यांनी ट्विटरवर टीका केली आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवरील 2 वर्षांची बंदी 7 जानेवारी 2021 पासून लागू झाली आहे. या दिवशीच पहिल्यांदा त्यांच्या अकाऊंटचं निलंबन झालं होतं. ट्रम्प यांच्या कार्यकाळात फेसबुकने केलेली ही सर्वात कडक कारवाई होती.

थोडक्यात बातम्या-

आई आणि DSP दोन्ही कर्तव्य पार पाडली, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्यूटीवर

पिंपरीमध्ये वाईन शाॅप मालक आणि ग्राहकात तुफान राडा, पाहा व्हिडीओ

टाटा मोटर्स लवकरच करणार सीएनजी कार लाँच; ‘ही’ असणार किंमत

700 कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊतांचा दावा; किरीट सोमय्यांना केलं लक्ष घालण्याचं आवाहन

“…लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More