बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संसदरत्न पुरस्काराने चार वेळा सन्मानित काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची कोरोनावर मात

पुणे |  तब्बल 19 दिवसांच्या उपचारानंतर काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी कोरोनावर मात केली आहे. आता लवकरच राजीव सातव यांना रुग्णालयातून सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यापासून राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत होती. त्यांचे शरीर डॉक्टरांच्या उपचारांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद द्यायला लागले. तसेच त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही सामान्य स्थितीत आली होती.

23 एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते. अखेर 19 दिवसांच्या उपचारानंतर राजीव सातव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे नियंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

दरम्यान, हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या

धक्कादायक! अभिनेत्री आणि तिच्या बहिणीवर बलात्कार करुन केलं ‘हे’ लज्जास्पद कृत्य

आमच्यावर विश्वास ठेवा, कोरोना धोरण आखण्यात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही- केंद्र सरकार  

मुलाची कैफियत ऐकल्यानंतर अजित पवार झाले भावुक; एक फोन फिरवला अन्…

…तर भाजप आमदाराला चपलीनं मारू; भाजप प्रवक्त्याची भाजप आमदाराला धमकी

एका आठवड्यात 5 वेळा इंधन दरवाढ; पेट्रोल पुन्हा शंभरी पार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More