बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारकडून दुचाकीच्या हेल्मेटबाबत ‘हे’ नवे नियम लागू, अन्यथा…

नवी दिल्ली | देशभरामध्ये दुय्यम दर्जाचे आणि बनावट हेल्मेट वापरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार आता बनावट हेल्मेट वापरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात येणार आहे.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बनावट आणि दुय्यम दर्जाचे हेल्मेट विक्रीस उपलब्ध आहेत. परंतु, त्यामुळे दुचाकीस्वाराच्या जीवास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवे नियम लागू करून दुय्यम दर्जाचे हेल्मेट वापरणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

आयएसआय मार्क बीआयएस सर्टिफाइड हेल्मेट वापरणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जर आपल्या हेल्मेटवर आयएसआय मार्क नसेल आणि बीआयएस सर्टिफिकेशन देखील नसेल तर आपण दंडास पात्र आहात. ज्या हेल्मेटवर बीआयएस सर्टिफिकेशन नसेल अशा दुचाकीस्वारांना दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

आयएसआय मार्क नसणाऱ्या आणि बनावट हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना 5 लाखांचा दंड आणि एक वर्षांचा कारावास भोगावा लागू शकतो. दरम्यान, दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी आणि बनावट हेल्मेट वापरणे बंद व्हावे, यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकीस्वारांनी अधिकृत आणि सुरक्षित हेल्मेट वापरणे गरजेचे आहे.

थोडक्यात बातम्या

थट्टा नशिबानं लावली! वीज पडून 350 क्विंटल कांद्याचा झाला कोळसा

रासायनिक कंपनीतल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

मुंबईत दररोज हजारांच्या आत नव्या कोरोनाबाधितांची होतेय नोंद, कोरोनामुक्तीचा दर वाढला

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! पैशाच्या लोभापाई सासऱ्याने सुनेला विकलं अन्…; अशा प्रकारे झाला उलगडा

अखेर बहुप्रतिक्षित आयपीएलचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेपासून होणार उर्वरित सामने

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More