बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनातून देश सावरतोय; देशातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 70 दिवसांतील मोठी घट

नवी दिल्ली | कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतात परिस्थिती काही अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील 70 दिवसांमधील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 84,332 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 70 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तर काल दिवसभरात मृतांचा आकडा मात्र वाढला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 4002 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

गुरुवारी देशभरात कोरोनाचे 91,702 नवे रुग्ण मिळाले होते. त्या तुलनेत काल नव्या रुग्णसंख्येत तब्बल 7 हजारांनी घट झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1,21,311 इतकी आहे.

देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना विषाणूमुळं संक्रमित झालेले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे. देशातील कोरोना मृत्यूदर 1.24 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रिकव्हरी रेट 95 टक्क्यांहून जास्त झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्येचं प्रमाण 4 टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. सक्रिय कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर एकूण बाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘मुस्लिमांनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावं’; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

‘…तर पुनावालांना सुरक्षा देऊ’; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

शेतात पेरणी करतानाचा एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

अबब! केवळ 12 दिवसात तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागलं इंधन; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पुणे विद्यापीठात फिरायला यायचं असेल तर यापुढे पैसे द्यावे लागणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More