नवी दिल्ली | हवामान खात्याकडून 6 मे रोजी चक्रीवादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. श्रीलंकेने या चक्रीवादळाला ‘असनी’ असे नाव दिले आहे. हे चक्रीवादळ आकार घेण्यास यशस्वी झालं तर यंदा सलग तिसऱ्या वर्षी भारताच्या सागरी भागात वादळ येईल.
उत्तर अंदमान समुद्रात कधीही हे चक्रीवादळ तयार होऊ शकतं. त्यामुळे इथे कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याती शक्यता आहे. 5 मे पर्यंत यामध्ये आणखी वाढ होऊन 6 मे रोजी चक्रीवादळ येईल, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.
हे चक्रीवादळ अतिशय वेगाने ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम पश्चिम बंगाल, सिक्किम, मेघालय, आसाम, मिझोराम, नागालँड आणि इशान्येकडील राज्यांमध्ये दिसू शकतो.
दरम्यान, या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळापूर्वी 2020मध्ये अम्फान वादळाचा फटका पश्चिम बंगालला बसला होता. त्यानंतर 2021मध्ये यास वादळाने ओडिशाला प्रभावित केले होते. त्यानंतर यंदाही हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
‘…तर पुतिन यांची हत्या होऊ शकते’, धक्कादायक माहिती समोर
मोठी बातमी! जेलमधून सुटताच राणा दांपत्य घेणार ‘या’ भाजप नेत्याची भेट
पेट्रोल-डिझेलच्या दरात आज काय बदल झाले?, वाचा आजचे ताजे दर
Weather Update: राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
‘जबरदस्तीने ओरल सेक्स करायचा’; प्रसिद्ध अभिनेत्यावर एक्स वाईफचा गंभीर आरोप
Comments are closed.