बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डॉक्टरनं क्लिनिकमधील मुलीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

भोपाळ |  मध्य प्रदेशमधील सतना जिल्हयात एका डॉक्टरने आपल्या क्लिनिकमधील मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यानंतर तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित डॉक्टरचं नाव आशुतोष त्रिपाठी आहे तर तरूणीचं नाव विभा केवट असं होतं.

डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये काम करणारी तरुणी विभा केवट ही 14 डिसेंबर 2020 नंतर बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी याबाबत डॉक्टरांकडे विचारणा केली. मात्र विभा कामानिमित्त बाहेर गेल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. बरेच दिवस उलटून गेले पण ती परतली नाही. डॉक्टरकडे विचारणा केली पण त्याने उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली.

विभाच्या कुटुबियांनी त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी डॉक्टरची चौकशी केल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला चुकीची माहिती देऊन डॉक्टरने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी डॉ. त्रिपाठीचे कॉल डिटेल्स मागवले. त्यामध्ये तरुणीचं अखेरचं बोलणं डॉक्टरसोबत झाल्याचं समोर आलं.

दरम्यान, डॉक्टर आणि तरुणीचे प्रेमसंबंध होते. तरुणीने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. 14 डिसेंबरलाही दोघांमध्ये जोरदार भांडण आणि बाचाबाची झाली. त्यानंतर डॉक्टरने क्लिनिकमध्येच तिचा गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह क्लिनिकच्या बाजूलाच गल्लीत खड्डा खोदून पुरला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी खड्ड्यातील मृतदेह बाहेर काढला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

थोडक्यात बातम्या-

पहिल्या भेटीतच महिला काढायला लावायच्या कपडे, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

“खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा साठा केला असता तर जीव वाचले असते”

प्रचाराचा असाही फंडा!, राजू शेट्टींनी वापरली ‘ही’ भन्नाट आयडिया

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’मधील वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन

भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More