बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाचवीतील मुलीनं सरन्यायाधीशांना लिहिलं पत्र, म्हणाली….

तिरुवनंतपुरम | कोरोनाच्या दुसऱ्या लोटेने तर मृत्युचं तांंडवच चालवलं आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. यावर सर्वोच्च न्यायालयानं विविध याचिकांवर सुनावणी करताना महत्त्वाचे निर्देश दिले.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लोकांचे जीव वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या भूमिकेचं केरळमधील पाचवीतील एका मुलीनं पत्रातून कौतुक केलं आहे. केरळमधील त्रिसूरमधील केंद्रीय विद्यालयात पाचवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या दहा वर्षांच्या लिडविना जोसेफ हिनं सरन्यायाधीशांना लिहिलं. दिल्लीमध्ये ऑक्सिजन अभावी होणाऱ्या मृत्यूंमुळे मी फारच अस्वस्थ झाले होते. सर्वोच्च न्यायालयानं या गोष्टीची दखल घेतल्याचं वर्तमानपत्रांतून वाचलं. लोकांचे जीव वाचवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांबद्दल मी आभारी आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती सुधारल्यानं मला आनंद झाला, असं लिडविना हिनं पत्रात म्हटलं.

लिडविना जोसेफनं थेट सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहून त्यासोबत एक चित्र जोडलं आहे. यामध्ये एक न्यायाधीश कोरोनावर हल्ला करताना दाखवलं आहेत. या मुलीला सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्याकडून उत्तर देखील मिळालं आहे.

दरम्यान, देशातील घडामोडींकडे उघड्या डोळ्यांनी बघत असल्याबद्दल तुझे कौतुक, तसेच लोकांच्या आरोग्याबाबत तुला वाटत असलेली तळमळ वाखाणण्याजोगी आहे. सुजाण नागरिक म्हणून तू तुझी वाटचाल कायम ठेवशील व देशाच्या उभारणीत हातभार लावशील अशी आशा आहे, असं सरन्यायाधीशांनी तिला पाठवलेल्या उत्तरात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

रेल्वे रूळ की नदी?, पहिल्या पावसात मुंबईची झाली तुंबई, पाहा व्हिडीओ

आश्चर्यकारक! ‘या’ महिलेने एकाचवेळी दिला 10 मुलांना जन्म

खुशखबर! लॉकडाऊननंतर फक्त 72 रूपयांमध्ये ‘या’ ठिकाणी राहायची सोय

कौतुकास्पद! कोरोना काळात उपासमार होणाऱ्या 500 माकडांना पोलिस हवलदाराची मदत

ड्रामा क्वीन राखी सावंत बारीक होण्यासाठी करतीये प्रचंड मेहनत, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More