बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ एसटी कामगारांची नोकरी जाणार?; एसटी महामंडळाकडून कारवाई सुरू

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी महामंडळाच राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, राज्य सरकारकडून ही मागणी मान्य झाली नसल्याने संप सुरूच आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता संपावर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाच मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेलं आहेच. शिवाय, प्रवाशांचेही हाल होत आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतंरही एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला असल्याने आता महामंडळाने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे.

या कारवाईनंतर एसटी महामंडळाने आता कर्मचाऱ्यांना कायमचं कामावरून काढून टाकण्याची कारवाई सुरू केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी न्यायलयाचा आदेश आल्यानंंतर एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून संप मागे घ्यावा, अशी विनंती केली होती. नाहीतर कडक कारवाई करावी लागेल असा ईशाराही दिला होता.

दरम्यान, विलनीकरणाचा निर्णय तात्काळ घेणं शक्य नसल्याचं राज्य सरकाडून सांगण्यात आलं आहे. तर जोपर्यंत एसटी महामंडळाच सरकारमध्ये विलनीकरण होत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. असं एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांमधील हा संघर्ष अधिकच वाढताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

“बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीये”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर लवकरच होणार ‘ही’ शस्त्रक्रिया

अंबानींच्या घराचा पत्ता विचारणारे ‘ते’ दोघं होते तरी कोण?; आली ‘ही’ माहिती समोर

“देवेंद्रजी, अंडरवर्ल्डशी संबंध असलेला ‘तो’ माणूस तुमच्या डिनर टेबलवर कसा?”

“तुम्ही मुख्यमंत्री असताना गुन्हेगारांना मोठ्या पदावर का बसवलं?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More