बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं राज्यपालांना झेपलं पाहिजे- संजय राऊत

मुंबई | विधानसभेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगत सिंग कोश्यारींना (Governor Bhagat Sing Koshyari) प्रश्न विचारला होता. त्यावर अभ्यास करून निर्णय देतो, असं आश्वासन राज्यपालांनी दिलं आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

राज्यपाल आपले फार अभ्यासू आहेत. त्यांना प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा लागतोय. इतका अभ्यास बरा नाही. त्या अभ्यासाचं ओझं झेपलं पाहीजे. इथे मुळात लॉकडाऊन काळात अभ्यास कमी झाला आहे. आता प्रत्येक गोष्टीत अभ्यास करायला लागलात, असा टोला संजय राऊत यांनी राज्यपालांना लगावला आहे.

12 आमदारांच्या शिफारशीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्या शिफारशी बंधनकारक आहेत. आप संविल्याधानात लिहीलं आहे. पण राज्यपालांचा अभ्यास सुरु आहे. शातंता अभ्यास सुरु आहे. असं नवीन नाटक सध्या राजभवनात सुरु आहेत. त्याचे पात्र केवळ राज्यपाल नाही तर भाजपचे नेतेही आहेत. आता काही दिवस नाटक चालेल. नाटक रंगू द्या, असा घणाघातही त्यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यपालांना उलटसुलट बोलायचा अधिकार महाविकास आघाडीचा आहे. नियमांमध्ये बदल करून तुम्ही तारीख मागत आहात. राज्य सरकारने राज्यपालांचा आणि घटनेचा अपमान केला आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

…अन् खासदार नवनीत राणा महिलांसोबत धावू लागल्या; पाहा व्हिडीओ

विधानसभा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?, काँग्रेसमधील घडामोडींना वेग

मोदी सरकारची भन्नाट योजना, मिळणार तब्बल 36,000 रूपये

JIO ग्राहकांसाठी खुशखबर! नववर्षाआधी आणला ‘हा’ भन्नाट प्लॅन

“जीन्स घालणाऱ्या मुलींना मोदी आवडत नाहीत, फक्त ‘त्या’ महिलांवरच…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More