मुंबई | राज्याची राजधानी मुंबईपासून देशाच्या राजधानी दिल्लीपर्यंत हनुमान चालीसावरून गोंधळ चालू आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारला इशारा देत दोन दिवस मुंबईत मुक्काम केला होता. त्यानंतर त्यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता राणा दाम्पत्याला उच्च न्यायालयात देखील मोठा धक्का बसला आहे.
मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा ही राणा दाम्पत्याची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. प्रक्षोभक वक्तव्य करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. राणा दाम्पत्याला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
जबाबदार पदांवर असणाऱ्या व्यक्तींनी विशेषत: लोकप्रतिनिधींनी एकमेकांविषयी आदराने बोलावे आणि वागावे असं आम्ही वारंवार म्हटलं आहे, पण याकडं लोकप्रतिनिधी कानाडोळा करतात. लोकप्रतिनिधींकडून याप्रकरणी काही अपेक्षा करणं चुकिचं आहे, असं म्हणत न्यायालयानं राणा दाम्पत्याला फटकारलंय.
दरम्यान, राणा दाम्पत्यानं केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. राणा दाम्पत्याची मागणी फेटाळल्यानं राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
थोडक्यात बातम्या –
“भारताचे पुढील पंतप्रधान गौतम अदानी होणार”
‘मी खालच्या जातीची असल्याचं म्हणत त्यांनी मला…’; नवनीत राणांचा अत्यंत गंभीर आरोप
“जर कोणी हिटरल प्रवृत्तीनं वागायचं ठरवलं असेल तर…”
“निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार मी येणारच्या घोषणा दिल्या आता मात्र…”
किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
Comments are closed.