बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आशियातला सगळ्यात मोठा मॉल, मात्र सुरुच झाला नाही; आग लागलेल्या मॉलबद्दल आणखी धक्कादायक गोष्टी समोर

मुंबई | भांडुप येथील ‘ड्रीम मॉल’मध्ये रात्री 12 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल रात्री लागलेल्या या आगीत कोव्हिड रुग्णालयातील 6 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या आगीत मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा मॉल शापित मॉल असल्याचे देखील बोलले जात आहे.  मुंबईत काही दिवसांपूर्वी मॉलचा सर्व्हे झाला होता. यात 29 मॉलमध्ये फायर यंत्रणा योग्य नसल्याचं समोर आलं होतं.  यात भांडुप येथील या ‘ड्रीम मॉल’चा समावेश होता.

भांडुपच्या ‘ड्रीम मॉल’मधील सनराइज हॉस्पिटलला लागलेल्या आगीतील मृतांची संख्या 6 वर पोहोचली आहे. आगीच्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश ककाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

हा मॉल शापित प्रॉपर्टी आहे. ‘एचडीआयएल’ने तो बांधला आहे. हा आशियातील सर्वात मोठा मॉल होता. पण केसेस सुरू झाल्या आणि तो सुरूच झाला नाही. 10 ते 15 वर्ष मॉल असाच रिकामा आहे, त्यात मल्टिप्लेक्स फक्त सुरू आहे, त्यात हे हॉस्पिटल कसे सुरू झाले हा पण प्रश्न आहे. सगळ्यात जास्त अनधिकृत धंदे करणारी कार्यालयंही याच मॉलमध्ये आहेत, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, भाजप नेते कीरीट सोमय्या यांनी घटनास्थळाची पाहणी केली. हा मॉल म्हणजे घोटाळ्याचा महाल आहे. ‘एचडीआयएल’ने हा मॉल बांधला. या हॉस्पिटलला ओसी नाही, अग्निशामक यंत्रणा नाही. आज इथे मृतकांची संख्या 2 आकडी होऊ शकते. यासाठी या मॉलच्या मालकाला जबाबदार धरलं पाहिजे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

‘दिपाली वाचली असती, ही आत्महत्या नाही तर…’; चित्रा वाघ आक्रमक

लोकांची थोडी मानसिकता केली पाहिजे ना?; अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य

मॉलमधील आगीत होरपळून ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी, म्हणाले…

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

वनअधिकारी दिपाली चव्हाणांची मन सुन्न करणारी सुसाईट नोट आली समोर!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More