नवी दिल्ली | 2020 या वर्षाचे काही मोजके दिवस बाकी आहेत. दरम्यान या वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण आज दिसणार आहे. जवळपास 5 तास हे सूर्यग्रहण राहणार आहे.
यंदाच्या वर्षाचं हे शेवटचं सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेच्या चीली, अर्जेंटिना तसंच अंटार्क्टिकाच्या काही भागांमधून पाहता येणार आहे. मात्र भारतात हे सूर्यग्रहण पाहायला मिळणार नाहीये.
सूर्यग्रहण सुरु होईल त्यावेळी सूर्यास्त होत असल्याने ग्रहण भारतात पाहता येणार नाहीये. दरम्यान या सूर्यग्रहणाचं नासा थेट प्रक्षेपण करणार असून ते युट्यूबवर पाहता येणार आहे.
9.30 वाजता संपूर्ण सूर्याला ग्रहण लागणार असून रात्री 12.23 पर्यंत ग्रहण असेल. थेट डोळ्यांनी पाहता येणं शक्य नसल्याने नासाच्या यूट्यूब चॅनेलवर ग्रहण थेट पाहता येणार आहे.
थोडक्यात बातम्या-
मला आता आरामाची गरज आहे; कमलनाथ यांचं मोठं विधान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित!
कुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पदड्याआड- अजित पवार
धक्कादायक! समुद्रकिनारी प्राचीन वस्तु म्हणून आणली घरी पण घडलं विचित्रच
ईडीने खेळीमेळीच्या वातावरणात माझी चौकशी केली- प्रताप सरनाईक