बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ नेत्यानं चक्क धनगरी वेश परिधान करून केला जागर; समाजाला आरक्षणासाठी केलं आवाहन

सांगली | मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच आता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणासाठी येत्या 31 मेला धनगर समाजानं जागर करावा, असं आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. धनगर आरक्षणाचा जागर करण्यासाठी गोपीचंद पडळकरांनी चक्क धनगरी वेशातून समाजाला आवाहन केलं आहे.

येत्या 31 मेला देशातील संपूर्ण बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून धनगरी वेशात ही जयंती साजरी करायची आहे. धनगर आरक्षणचा जागर करून या महाविकास आघाडीला आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी समस्त धनगर समाजाला केले आहे. गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवरून हे आवाहन केलं आहे. पडळकर यांनी पारंपारिक वेशात आवाहन करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरवही केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मी चौंडीला जाऊन दर्शन घेणार आहे. हा जयंतीचा कार्यक्रम लाईव्ह दाखवणार आहे. कोरोनामुळे इतरांना चौंडीला येता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी घरीच राहून अहिल्यादेवींच्या फोटोचं पूजन करावं. अहिल्यादेवींचं दर्शन घेऊन मी धनगर आरक्षणाचा विसर पडलेल्या सरकारला जागं करण्याचा निर्धार करणार आहे. सर्वांनी पारंपारिक वेशभूषा करत या जागरमध्ये सामिल व्हावं. या सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून द्या. सरकारला हादरा बसला पाहिजे.

दरम्यान, धनगर आरक्षणासाठी आपण 2011 रोजी अखेरचा लढा दिला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारने ‘जे आदिवासींना ते धनगरांना’ असं मान्य करून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्यात धनगड नावाची जमात अस्तित्वात नसून आहेत ते धनगर आहेत, असं प्रतिज्ञापत्रं फडणवीस सरकारने कोर्टात सादर केलं होतं. जोपर्यंत धनगर समाजाला एसटीचा दाखला मिळत नाही. तोपर्यंत धनगर समाजासाठी एक हजार कोटीचं बजेट सरकारने मंजूर केलं होतं. पण महाविकास आघाडी सरकार आल्यापासून एकही योजना लागू केली नाही किंवा एक रुपयाही धनगर समाजाला दिला नाही.

 

 

 

थोडक्यात बातम्या –

“प्रियांका, कंगणाला भेटणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान”

पुणे हादरलं! फुरसुंगीत कॅनॉलमध्ये एकामागोमाग एक मृतदेह आले वाहत

“बाबा माझे कपडे फाटलेत…”,बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी दीड वर्षांनंतर परिवाराला भेटली

“भाजपने ॲापरेशन लोटसचा कधीच दावा केला नाही, तरी एवढी धास्ती का?”

12 नावांची यादी खरंच भूतांनी पळवली?, राज्यपाल कार्यालयाचं तात्काळ स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More