बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! ओमीक्रॉन रुग्णांमध्ये आढळतंय ‘हे’ प्रमुख लक्षण, लस घेतल्यांनाही होते लागण

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा नवीन व्हेरीयंट ओमीक्रॉनने (Omicron) खळबळ माजवली आहे. ओमीक्रॉन मोठ्या वेगाने भारतात पसरत आहे. त्यातच ओमीक्रॉनबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ओमीक्रॉनचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांमध्ये घसा खवखवणे हे प्रमुख लक्षण आढळत असल्याचं समोर आलं आहे.

ओमीक्रॉनचा संसर्ग झालेल्या 72 टक्के रुग्णांमध्ये घसा खवखवणे हे प्रमुख लक्षण आढळलं आहे. शिवाय या रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. त्यानंतरही या रुग्णांना घसा खवखवणे हे लक्षण जाणवले आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्येही घसा खवखवणे हे लक्षण आढळलं आहे. मात्र, ओमीक्रॉनच्या रुग्णांमध्ये हे जास्त आढळलं आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमीक्रॉनच्या लक्षणांचा एक वेगळा पॅटर्न आहे. जो इतर व्हेरियंटपेक्षा वेगळा आहे. यामध्ये डेल्टा व्हेरियंटप्रमाणे चव आणि वास घेण्यास समस्या येत नाही. तर ओमीक्रॉनमध्ये फक्त घशात खवखव आणि कफ यांचा त्रास होतो. कारण ओमीक्रॉन नाकापर्यंत पोहोचण्याआधी घशाला संसर्ग करतो.

दरम्यान, सध्या राज्यात कोरोना व्हेरियटंने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध वाढविण्यास सुरूवात केली आहे. प्रशासनाने राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील पर्यटनावरही निर्बंध लावले आहेत. पुण्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“वकीलसाहेब स्वत: डिप्रेशनमध्ये आहेत, आम्ही त्यांची हकालपट्टी करत आहोत”

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘या’ भावनिक व्हिडीओमागील सत्य आलं समोर

मोठी बातमी! लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूमध्ये दाखल

“शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: पुढं जाऊन संप मिटवा”

‘…तर पुन्हा युती होईल’; रामदास आठवलेंनी सांगितला युतीचा नवा फॉर्म्युला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More