Top News जळगाव महाराष्ट्र

“कर्जमाफीच्या फक्त घोषणा केल्या, प्रत्यक्षात शेतकऱ्यांचं पूर्ण कर्जमाफ झालेलं नाही”

जळगाव | शासनाने कर्जमाफीच्या फक्त घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांचं पूर्ण कर्जमाफ झालेलं नाही, असा दावा भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने कहर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी विचारले असता त्यांनी कर्जमाफीसह सरकारांच्या अनेक योजनांवर टीका केली आहे.

गेल्या 75 वर्षापासून शेतकऱ्यांची परिस्थिती फारशी बदललेली नाही. आधी शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करायचे. मात्र आता आधुनिक शेतीकडे शेतकरी वळला आहे. मात्र तेव्हापासून शेतकरी हा निसर्गाशी सामना करतोच आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

एकनाथ खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले…

सारथी संस्थेबाबत ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय!

‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही- आमिर खान

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या