बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लेकरांना बंधाऱ्यात फेकून आई फरार, धक्कादायक कारण आलं समोर

जयपूर | उदयपूर येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या घटनेमध्ये एक आई स्वतःच्या पोटच्या पोरांना बंधाऱ्यामध्ये फेकून फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारामागे अगदी क्षुल्लक कारण समोर आलं असून यामध्ये तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित घटनेमधील आईचं तिच्या पतीसोबत काही कारणांवरुन वाद पेटला होता. हा वाद अगदी क्षुल्लक कारणावरुन पेटला होता. मात्र हाच वाद नंतर इतका विकोपाला गेला की, संबंधित पत्नीने रागाच्या भरात आपल्या मुलांना घराबाहेर नेलं. या दाम्पत्याला तीन मुलं आहेत. यामध्ये तीन वर्षांचा मुलगा रोहित, पाच वर्षांची माधवी तर सहा महिन्यांचा ललित यांचा समावेश आहे.

संबंधित पत्नीचं नाव हाकारी असं आहे. हाकारीने रागाच्या भरात आपल्या लेकरांना खेड्याजवळील बंधाऱ्यात नेऊन फेकलं. तसेच त्यानंतर हाकारी तेथून फरार झाली. तीन मुलांना बंधाऱ्यात बघताच गावकऱ्यांनी बंधाऱ्याकडे धाव घेत मुलांना बाहेर काढले. मात्र यावेळी रोहित आणि ललितचा गुदमरुन जीव गेला.

दरम्यान, गावकऱ्यांनामुळे माधवीचा जीव वाचवण्यात आला आहे. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास चालू केला आहे. तसेच हाकारी फरार असल्यामुळे तिचा देखील शोध सुरु आहे.

थोडक्यात बातम्या-

… आणि त्या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासी संख्या घटल्याने पुणे विभागातील ‘या’ रेल्वे गाड्या राहणार बंद

राज्यातील 12वी बोर्डाची परीक्षा रद्द होणार?; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं सुचक वक्तव्य

पुणे महापालिकेच्या जॅमरवर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांचा खळखट्याक हातोडा; पाहा व्हिडिओ

टी 20 वर्ल्ड कपसाठी ‘हे’ 3 गोलंदाज घेऊ शकतात भुवनेश्वर कुमारची जागा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More