बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब! 13 फुटी सापाला उचलण्यासाठी लागली जेसीबीची गरज; व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आपण अनेकदा व्यक्ती तसेच पक्षी, प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होताना पाहत असतो. परंतु अलिकडचे व्हायरल झालेल्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. एका व्हिडीओमध्ये चक्क सापाला उचण्यासाठी जेसीबीची गरज पडली आहे. हा व्हिडीओ बघून सगळेच जण हैराण झाले आहेत.

व्हिडीओमध्ये एका भल्या मोठ्या सापाला चक्क जेसीबीने उचलताना दिसत आहे. हा साप कॅरेबियन डेमिनिका बेटावरील जंगलातील असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्याची लांबी तब्बल 13 फुट असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे एवढा मोठा साप बघून सोशल मीडियावरील सगळ्याच जण अवाक झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड करण्यात आला आहे. त्या व्हिडीओला कमी वेळातच 79 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्ही केल्या आहेत.

दरम्यान, टिकटॉकवर अपलो़ड करण्यात आलेल्या व्हिडीओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतका मोठा साप माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत आहे. अरे सोडा रे त्याला.. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“कदाचित गांज्याची नशा उतरली नसल्यानं संजय राऊत…”

“समीर वानखेडेचा बाप बोगस होता, तुला तुरूंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही”

पुण्यातील बँकेवर फिल्मी स्टाईल दरोडा, घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद; पाहा व्हिडीओ

‘फडणवीसांची जिरवायची होती’?; वडेट्टीवारांच्या दाव्यावर नितीन गडकरींचं प्रत्युत्तर

‘शेतकऱ्यांची अडवणूक केली तर याद राखा…’; अजित पवारांचा थेट इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More