Top News कोरोना विदेश

फक्त इंग्लंडच नाही तर ‘या’ देशांमध्येही झालाय नव्या कोरोनाचा प्रसार

लंडन |  नुकताच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नविन विषाणू आढळून आलाय. त्यामुळं ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. नव्या प्रकारच्या कोरोनाचे रुग्ण फक्त ब्रिटनमध्ये नसून इटलीमध्येही एक रुग्ण आढळून आला आहे.

इटलीसोबतच इतर देशांमध्येही या संसर्गाचे रुग्ण असल्याचे समोर आलं आहे. ब्रिटनसह डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स आणि इटलीमध्ये नव्या विषाणूने बाधित झालेले रुग्ण आढळले असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

नव्या प्रकारचा हा कोरोना विषाणू आपल्या देशात आधीपासून असल्याची शंका काही देशांनी व्यक्त केली आहे. तसेच ब्रिटनमध्ये नव्या विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या कमी आहे. मात्र, संसर्ग वेगाने फैलावत असल्यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, या नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे जगभरातील देश सतर्क झाले असून, उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘सध्याची परिस्थितीही नियंत्रणाबाहेर नाही पण…’; कोरोनाच्या नव्या विषाणूवर WHO दिली महत्वाची माहिती

कोरोना लसीचा धसका!; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उचललं मोठं पाऊल

धक्कादायक! लंडनमधून भारतात आलेल्या ‘त्या’ विमानात सापडले कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशी

‘तयार रहा… बिहारमध्ये पुढच्या वर्षीही निवडणुका होऊ शकतात’; तेजस्वी यादवांनी केला गौप्यस्फोट

“मोतीलाल वोरांचं आयुष्य हे जनसेवेचं आणि काँग्रेसच्या विचारांप्रती असलेल्या निष्ठेचं आर्दश उदाहरण”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या