बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील सक्रिय रूग्णसंख्या घटली; बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं, वाचा आकडेवारी

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची गेल्या 24 तासातील आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 2 हजार 116 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 4 हजार 293 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही काहीशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 38 हजार 859 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 92 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 6 लाख 27 हजार 373 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.

रुग्ण वाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील आजची रुग्णसंख्या ही मागच्या 2 ते 3 दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या असल्याचं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या –

काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाकडून डाॅक्टरला मारहाण ; पाहा व्हिडीओ

‘प्राण जाये पर शान ना जाये’; कोविड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांना असा होतोय तंबाखू आणि गुटख्याचा पुरवठा

‘पीएम केअरचा पैसा बाहेर काढा’; 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं मोदींना खुलं पत्र

‘…म्हणून भारतात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांनी सांगितलं कारण

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे 6 मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More