बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक

मुंबई | राज्यात आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. राज्यात आज दिवसभरात 59 हजार 500 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 48 हजार 621 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात आज 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीसह राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 40 लाख 41 हजार 158 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 लाख 71 हजार 22 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 39 लाख 8 हजार 491 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 28 हजार 593 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्याच्या स्थितीत 6 लाख 56 हजार 870 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. कारण कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

ऑक्सीजनच्या कमतरतेवरून सुब्रमण्यम स्वामींनी मोदी सरकारला झापलं, म्हणाले…

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याबाबत तात्याराव लहानेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले..

भारतात कोरोना स्थितीचा वाईट काळ येणं अजून बाकी आहे- सुंदर पिचाई

“बीसीसीआयने 700-800 कोटींची मदत करावी, देशाला उपकाराची परतफेड करण्याची वेळ”

अवघ्या 32 वर्षीय IRS अधिकारी अनंत तांबेंचं कोरोनानं निधन!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More