बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट कायम; वाचा आजची आकडेवारी

नवी दिल्ली | देशात गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवलेला पाहायला मिळला होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशात वेगानं लसीकरण सुरु करण्यात आलं. यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. अशातच काल देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

देशभरात सध्या 4 लाख 2 हजार 188 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना झालेल्या 3 कोटी 19 लाख 69 हजार 954 रुग्णांपैकी 3 कोटी 11 लाख 39 हजार 457 रुग्ण बरे झालेत. रविवारी देशात 35,499 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 04 लाख 28 हजार 309 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

भारतात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्यात आता नवा डेल्टा प्लस व्हायरस आल्याने अजून चिंतेत भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या –

आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी; ‘इतक्या’ हजार पदांसाठी भरती, वाचा सविस्तर

मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्सची बैठक; आज ‘हे’ मोठे निर्णय घेण्याची शक्यता

राज कुंद्राच्या अटकेनंतरही शिल्पाच्या बहिणीची बिग बाॅसमध्ये एंट्री, पाहा व्हिडीओ!

“पंतप्रधान मोदी तुम्ही सभागृहात या अन् हिम्मत असेल तर चर्चा करा”

‘नावात काय आहे’ म्हणणाऱ्यांना झटका, ‘हे’ नाव असेल तर 501 रुपयांचं पेट्रोल फुकट मिळणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More