बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बळीराजाच्या सुखासाठी मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं, पंढरपूरच्या विकासाबाबत केली महत्त्वाची घोषणा

सोलापूर | विठ्ठल विठ्ठल जय हरी! म्हणत तब्बल दोन वर्षानंतर यावर्षी वारी निघाली होती. भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. टाळ मृदुगांच्या गजरात वारी निघाली आणि आज दोन वर्षांनंतर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या गजराने पंढरी दुमदुमली. अगदी भक्तीमय वातावरणात  यंदाची वारी पार पडली. तर पंढरपूर नगरीत 10-12 लाख वारकरी आज उपस्थित आहेत.

याचदरम्यान राज्याच्या राजकारणात मात्र नेत्यांची वेगळीच वारी सुरु होती. एकनाथ शिंदेनी बंड पुकारलं आणि त्यांच्यासोबत 40 आमदारांनी सुरत, गुवाहाटी, गोवा फिरत महाराष्ट्र गाठलं. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोणाला यावर्षी विठुरायाच्या पूजेचा मान मिळाणार? असा प्रश्न जनतेला पडला होता. अखेर एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदी वर्णी लावली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरच्या वि़ठुरायाची शासकीय पूजा पार पडली. यानंतर मुख्यमंत्र्यानी पत्रकारांशी संवाद साधला.

मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला पूजेचा मान मिळाला .राज्यात पाऊस उशीरा आला असला तरी सध्या बळीराजा सुखावला आहे. राज्यात कुठेही पूर परिस्थिती, अतिवृष्टी होऊ नये. बळीराजाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊदे. सर्व धर्मातील, जातीतील, लोकांच्या आयुष्यात भरभराट होऊदे. त्यांच्याही आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असं साकडं विठुरायाकडे घातलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान पंढरपूर आहे. लाखो लोकांच्या भावना विठ्ठल- रुक्मिणीशी जोडल्या आहेत. यामुळे मंदिराचा विकास होणं गरजेच आहे. यासंबधी मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यांच्याकडून पंढरपुरातील विठ्ठल मंदिर आणि आजूबाजील परिसऱ्याच्य़ा विकासाचा आराखडा मागितला आहे. यावर काम करता येईल, असंही एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

थोडक्यात बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न, शिंदेंच्या चारही पिढ्या होत्या उपस्थित

आलियाच्या प्रेग्नंसीबाबत करण जोहरने केला मोठा खुलासा!

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस

“शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे”

अमरनाथ घटनेवर अक्षय कुमारने व्यक्त केलं दुःख, म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More