बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बिरोबाच्या बनात येऊन खोट्या शपथा घेणाऱ्याचं पार वाटोळं होतं”

सांगली | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या कोणत्याही वक्तव्यामुुळे आणि कृतीमुळे चांगलेच चर्चेत असतात. गोपीचंद पडळकर सतत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर यांच्यावर निशाणा साधताना दिसतात. सांगली जिल्हातील कवठेमहाकाळ येथील ढालगाव भागातील टेंभू सिंचन प्रकल्पाच्या जलपूजन कार्यक्रम रविवारी पार पडला. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पडळकरांनावर निशाणा साधला आहे.

आरेवाडीतील धनगर समाजाचे जागृत देवस्थान बिरोबा हे राज्यभरात सुप्रसिद्ध आहे. बिरोबाच्या बनात येऊन आशीर्वाद घेतल्यावर चांगल्या गोष्टी घडतात. मात्र, बिरोबाच्या बनात येऊन खोट्या शपथा घेतल्यावर त्यांचं पार वाटोळं होतं, असा चिमटा जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांना काढला आहे. भाजपमध्ये अनेकजण प्रवेश करतात पण, त्यांना ना मान मिळतो ना कोअर कमिटीत स्थान मिळतं, असंही पाटील म्हणाले.

काही कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण, भाजप पक्षाचा अनुभव घेतल्यावर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत स्वपक्षात येण्याची इच्छा बोलून दाखवली असल्याचं देखील जयंत पाटलांनी यावेळी सांगितलं आहे. दरम्यान, जलपूजनाच्या कार्यक्रमात सांगलीचे खासदार संजय पाटील, तासगावच्या आमदार सुमन पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. जलपूजनाचा कार्यक्रम हा बिरोबाच्या बनात आयोजित केला होता.

दरम्यान, राज्यभरात आगामी काळात दौरा काढून ज्या कार्यकर्त्यांची स्वपक्षात येण्याची इच्छा आहे, त्यांचा प्रवेश लवकरच करून घेण्यात येईल. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी या भागातील काही कार्यकर्ते पुन्हा स्वपक्षात येणार असल्याचं देखील पाटलांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा’; काँग्रेसची मोठी मागणी

भारतीय खेळाडूंकडून लयलुट सुरूच; आणखी 3 पदकं भारताच्या खात्यात

‘शेतकऱ्यांची डोकी फोडून तुम्हाला जनआशीर्वाद मिळणार का?’; शिवसेनेचा संतप्त सवाल

अवनीची ऐतिहासिक कामिगरी! अवनी लेखराने पटकावलं सुवर्णपदक

अमेरिकेचा एअर स्ट्राईक! ड्रोन राॅकेटचा वापर करून आयसीसचा मोठा डाव उधळला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More