मुंबई | कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असून भारतात लवकरच लस उपलब्ध होणारे. यासाठी राज्य सरकारने देखील लसीकरणासाठी पूर्व तयारी केलीये. कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असून भारतात लवकरच लस उपलब्ध होणार आहे.
दरम्यान हे राज्यात होणार लसीकरण कसं असेल याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिलीये. राजेश टोपे म्हणाले, “लसीकरणाच्या कार्यपद्धतीनुसार तयारी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये ज्या व्यक्तीला लस द्यायची आहे त्या व्यक्तीला लसीकरणासंदर्भात मेसेज मिळणार आहे. हा मेसेज मिळाल्यालर त्या व्यक्तीने आपलं ओळखपत्रासह त्या दिवशी हजर रहायचं आहे.”
ते पुढे म्हणाले, “एकदा का एखाद्या व्यक्तीचं लसीकरण झालं की त्यानंतर अर्धा तास त्या व्यक्तीला तिथेच थांबवण्यात येणार आहे. यासाठी आपल्याकडे एकूण 18 हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेली आहे.”
दरम्यान डिसेंबरच्या अखेरपर्यंत जर केंद्र सरकारने परवानगी दिली तर जानेवारीपर्यंत लसीकरणाचा कार्यक्रम राबवता येईल, असंही आरोग्यमंत्री म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
…तर जानेवारीपासून राज्यात लसीकरणाला सुरुवात होईल- राजेश टोपे
कर्णधार विराट कोहलीच्या नावे नवा विक्रम; धोनीलाही टाकलं मागे
संजय राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी; प्रविण दरेकर यांची मागणी
‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका; महाविकास आघाडीची नाही- अजित पवार
ब्रेकिंग न्यूज, बार्किंग न्यूज होता कामा नये- उद्धव ठाकरे