बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात Omicron चा धोका वाढला; ‘या’ ठिकाणी सापडले आणखी 8 रुग्ण

मुंबई | कोरोना महामारीनं जगभरात थैमान घातलं आहे. यातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटनं तर चिंतेत भर पाडली आहे. आता कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्राॅनचा (Omicron) संसर्ग पसरायला लागल्याचं चित्र आहे. अशातच आणखी चिंतेत भर टाकणारी बातमी समोर येत आहे.

राज्यात आज आणखी 8 रुग्ण ओमिक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी 7 रुग्ण मुंबईतील तर 1 रुग्ण वसई-विरारमध्ये आढळला आहे. याविषयी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता हळूहळू ओमिक्राॅनच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

ओमिक्राॅन बाधित राज्याची संख्या आता 28 वर पोहोचली आहे. आता सापडलेल्या 8 रुग्णांमध्ये ओमिक्राॅनची सौम्य लक्षणं आढळल्यानं जास्त चिंतेची बाब नाही.

दरम्यान, आता ओमिक्राॅनचं सावट डोकं वर काढायला लागलं आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण पहायला मिळत आहे. लसीकरण मोहीम आता पुर्ण करण्यावर जोर दिला जातोय. तर बुस्टर डोसची (Booster dose) देखील मागणी होत आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोदींवर टीका करताना अमोल मिटकरींची जीभ घसरली, म्हणाले…

मृत स्वप्नील लोणकर मुलाखतीसाठी पात्र! वडिलांचा MPSC वर आरोप, म्हणाले…

अखेर शाळेची घंटा वाजणार! उद्यापासून राज्याच्या ‘या’ भागातील शाळा सुरू

सनी लिओनी म्हणते,”हा प्रसिद्ध चित्रकार कोण?”; अनिल कपूरनं दिलं भन्नाट उत्तर

Omicron Alert: जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More