बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुळशी पॅटर्नमधील ‘ती’ चहावाली अभिनेत्री आज कोट्यावधींची मालकीण, वाचा काय करतेय काम

मुंबई | खतरनाक म्हटलं की, आपल्याला आठवतो एकच पॅटर्न तो म्हणजे चित्रपट मुळशी पॅटर्न! सांगायचं असं की, या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटामध्ये तुम्ही एक चहाची टपरी चालवणारी सुंदर, गावरान अभिनेत्री गाण्यामध्ये पाहिलीच असेल. अभिनय क्षेत्रात चांगलं नाव झालं असताना मालविकानं सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतल्यानं लोक तिला वेड्यात काढू लागलेत.

मालविकानं स्वतःची ‘द ऑरगॅनिक कार्बन’ नावाची कंपनी सुरू केली. मग तिनं सेंद्रिय शेती करण्याचा विचार केला आणि यातूनच ती शेतकऱ्यांना देखील मदत करू लागली. थेट शेतकऱ्यांकडून दूध घेऊन दूध, तूप, दही,पनीर सोबत मिल्क ऑइल, कोकोनट ऑइल यासारखे अनेक पदार्थ त्यांच्या कंपनीत बनू लागले.

स्वतःचा ब्रँड तयार करत त्यांची कंपनी आता तब्बल 18 कोटींच्या घरात गेली आहे. वर्षाला जवळपास 4 कोटींचा नफा ते यातून कमावताना पाहायला मिळत आहे. शेतीशी कधी प्रत्यक्ष संबंध आला नाही. मात्र वडील मार्केट यार्डमध्ये ट्रेडर असल्यामुळे अप्रत्यक्षपणे संबंध होता. नियमित वर्तमानपत्र, मॅगझिन्स वाचायची सवय असल्यानं शेतकऱ्यांच्या समस्या नेहमी नजरेखालून जायच्या. माझं मन आयटी क्षेत्रात रमेनासं झालं. दुसरीकडे मला पूर्णवेळ शेती करण्याची तीव्र इच्छा होत होती. असं ती म्हणाली होती.

दरम्यान, विशाल चौधरी, मालविका गायकवाड आणि जयवंत पाटील यांनी एकत्र येऊन हंपी A2 नावाची दुधाच्या पदार्थांची कंपनी देखील स्थापन केली. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मालविकाच्या या कंपन्यांची खूप मदत झाली.

थोडक्यात बातम्या – 

IPL 2022: BCCI नं आयपीएल नियमांमध्ये केले ‘हे’ मोठे बदल

इंधन दरात काय बदल झाला?, वाचा आजचे ताजे दर

वारंवार तहान लागणंही शरिरासाठी ठरु शकतं घातक, वाचा काय आहे कारण

कोरोनाची चौथी लाट येणार?; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा, म्हणाले…

Holi 2022: होळीच्या दिवशी घरच्या घरी बनवा हर्बल रंग; जाणून घ्या पद्धत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More