नवऱ्याकडून अमानुष मारहाण; मदत मागण्यासाठी गेलेल्या गर्भवती पीडितेला पोलिसांनी हाकललं!
बीड | बीड जिल्ह्यात एकाने 10 लाख रूपयांसाठी आपल्या 3 महिन्याच्या गर्भवती बायकोला मारहाण केली आहे. याप्रकरणी त्याच्यासह चार जणांविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअतंर्गत दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत उल्हासनगरमध्ये राहणारा गणेश बोबडे याने माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील मीना नावाच्या तरूणीशी विवाह केला. लग्नाच्या अवघ्या ८ महिन्यानंतर त्याने गावाकडील फ्लॅट विकून 10 लाख रुपये आणून दे असा तगादा बायकोजवळ लावून धरला होता. गणेश याची नजर सासऱ्याच्या संपत्तीवर पडली होती. दहा लाख रुपये आणून देण्यासाठी गणेश आणि त्याचे आई वडील सतत तिला छळत होते. यात पीडित मीना गर्भवती राहिली. हा गर्भ स्वीकारण्यासाठी दहा लाख रुपये आणून दे असं म्हणत पती आणि सासरकडील मंडळीने पीडितेला डांबून ठेवून अमानुष मारहाण केल्याची माहिती आहे.
पीडितेची प्रकृती खराब झाल्याने तिला बेशुद्ध अवस्थेत माहेरी आणून सोडलं. यावेळी पीडितेच्या घरच्यांनी जाब विचारला असता त्यांनाही मारहाण करून आरोपी गणेश आणि त्याच्या घरचे पसार झाले. याप्रकरणी दाद मागण्यासाठी पीडित मीना आणि तिचे कुटुंब दिंद्रुड पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, इथेही पोलिसांनी अनेक तास ताटकळत ठेवत केवळ कौटुंबिक हिंसाचार अन्वये तक्रार घेऊन चौकशीवर ठेवलं. या प्रकरणात सासारकडील मंडळीवर अद्याप कारवाई झालेली नाही.
दरम्यान, या प्रकरणात न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या पीडितेला पोलिसांनी हाकलून दिलं. त्यानंतर पीडितेने पोलीस अधीक्षक आर राजा यांच्याकडे धाव घेऊन पोलिसांनी केलेल्या प्रकाराची तक्रार दिली आहे.
थोडक्यात बातम्या –
चिंताजनक! ‘कोरोना’ लसीचे डोस घेऊनही जिल्हाधिकारी आढळले ‘कोरोना पॉझिटिव्ह’
मोठी बातमी! सचिन वाझेंची ‘या’ विभागात करण्यात आली बदली
पुण्यातील लॉकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले…
अॅमेझाॅन आणि फ्लिपकार्टला टक्कर देणार भारताचा ‘अलिबाबा’; जाणून घ्या अधिक माहिती…
“नरेंद्र मोदींनाही अधूनमधून हुंदके फुटतात, अश्रूंचा बांध फुटतो, ते बरं चालतं”
Comments are closed.