बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘समांतर 2’ वेब सिरीज ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशातच मराठी सिनेमासृष्टीतील चॉकलेट बॉय अभिनेता स्वप्निल जोशीने आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. स्वप्नील सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. त्याच्या चाहत्यांसाठी तो वारंवार काही ना काही पोस्ट करतच असतो.

यावेळी त्यानी तो मुख्य भूमिकेमध्ये असलेली ‘समांतर’ वेब सिरीजचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार याची माहिती दिलेली आहे. ‘समांतर 2’ चा ट्रेलर येत्या 21 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचं स्वप्निलने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी एक लहानसा व्हिडीओही शेअर केला आहे.

त्या व्हिडीओमध्ये ‘समांतर’च्या पहिल्या भागामध्ये घडलेल्या काही घटना त्यामध्ये दाखवण्यात आल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ शेअर करताना स्वप्निलने ‘दोन काळ, दोन व्यक्ती, आणि एक रहस्य! पहा पुढे काय घडणार कुमारच्या आयुष्यात’, असं कॅप्शनही दिलं आहे. ‘समांतर’च्या पहिल्या भागामध्ये स्वप्निलने ‘कुमार महाजन’ नावाची व्यक्तीरेखा साकारली होती.

त्यामध्ये कुमार ‘सुदर्शन चक्रपाणी’ नावाच्या माणसाचा शोध घेताना दाखवलं आहे. कारण कुमारच भविष्य हे चक्रपाणी यांचा भूतकाळ होता. सिजनच्या शेवटी चक्रपाणी यांनी त्यांच्या भूतकाळात घडलेल्या घटनेची डायरी कुमारच्या हातात दिली होती. त्या डायरीनूसार कुमारच्या आयुष्यात काही घटनाही घडत होत्या आणि अचानक एका रोमांचक वळणावर कथेचा शेवट करण्यात आला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक

“मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा नाही झाली तर काय होईल हे सांगायची गरज नाही”

भाजपला धक्का; माजी मंत्री काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत!

आयटीचं बँड वाजणार, 30 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता

शिवसेनेनं आता सामना बंद करून बाबरनामा काढावा- अतुल भातखळकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More