Top News अमरावती

“…तर मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही”

अमरावती | राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे राज्य सरकारने 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केलीये. मात्र यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी टीका केलीये.

नवनीत राणा यांच्या सांगण्यानुसार, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत फार तोकडी आहे. शिवाय अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे झालेले नाहीत.

नवनीत राणा म्हणाल्या, “यंदा पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांचं नगदी पीक असणारं सोयाबीनचं पीक हातातून गेलंय. त्याचप्रमाणे कपाशीचे पीकसुद्धा वाया गेलंय. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी.”

“दिवाळीच्या अगोदर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 50 हजार रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जमा केली पाहिजे. जेणेकरून या मदतीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही. अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही,” अशा इशाराही राणा यांनी दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

“कांजूरमार्ग कारशेडचं काम थांबवण्याचं भाजपचं कटकारस्थान आहे”

राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्र सरकार करतंय- सुप्रिया सुळे

“घंटी वाजवली, फोनची लाईटही लावली मात्र मोदींनी…”

‘या’ कारणाने सूर्यकुमारला टीम इंडियात जागा नाही; रवी शास्त्रींनी सोडलं मौन

कंगणा राणावत आणि रंगोलीला मुंबई पोलिसांकडून समन्स; 10 नोव्हेंबरला हजर रहावं लागणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या