बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर मी बुलडोझर पुढे आडवा पडलो असतो”

पुणे | पुण्यातील आंबीला ओढ्याच्या कारवाईनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या प्रकरणावरून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.  अशातच काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही या प्रकारणात उडी घेतली आहे.

आज नितीन राऊत पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आंबील ओढा परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई प्रकरणी विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी त्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुणे महानगरपालिकेला लाज वाटली पाहिजे अशी कारवाई करताना. माझ्या नागपूरात अशी कारवाई झाली असती, तर मी बुलडोझर पुढे आडवा पडलो असतो, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन लागू होता. शेकडो लोकांचा रोजगार बुडाला आहे. अशा या बिकट परिस्थिती गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवताना पुणे महापालिकेला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत राऊतांनी पुणे महापालिकेवर टीका केली आहे. तसेच एवढं सगळं सुरू असताना महापौर काय झोपा काढत होते का?, असा सवालही त्यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना केला आहे.

महामारीच्या काळात ही कारवाई केली गेली आहे. त्यामध्ये महिलांवर अनेक प्रकारचे अत्याचरही केले असून, त्यामध्ये काही महिलांचे केस ओढले गेले आहेत. या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही नितीन राऊत यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन डोस घ्या अन्यथा…’; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी दिला इशारा

सर्वांची आवडती ‘ही’ अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई, स्वतःच दिली गुडन्यूज

निर्वासित मजुरांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; 31 जुलैपर्यंत ‘वन नेशन वन रेशन’ योजना लागू करा!

इस्ज्ञायल दूतावासाने मराठीतून ट्वीट करत ‘या’साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केलं अभिनंदन

आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील 3 चिमुकल्यांनी केली डेल्टा प्लस विषाणूवर मात

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More